सातारा : बेकायदेशीररित्या पाण्याचा वॉल जवळ बाळगल्याप्रकरणी सैद अहमद खान (वय 21, रा. शाहूनगर गोडोली सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवार दि. 1 मे रोजी चारभिंती येथील पाण्याच्या टाकी परिसरात सैद खान यांच्या जवळ पो.कॉ. संतोष घाडगे यांना 40 हजार रुपये किंमतीचा पाण्याचा वॉल मिळून आला. खान याच्याकडे चौकशी केली असता त्याने कोणतीही माहिती दिली नाही. यामुळे हा वॉल त्याने चोरुन आणल्याच्या संशयावरुन त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.हवा घोडके करत आहेत.