महाविकास आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर 20 रोजी धरणे आंदोलन; आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 18 July 2026


सातारा : विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित मागण्यासाठी दिल्ली जंतर मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलन चिरडणार्‍या मोदी सरकार विरोधात सातार्‍यातील महाविकास आघाडी पदाधिकार्‍यांनी त्यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा जाहीर केला. यासाठी सोमवार दि. 20 जुलै रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनाबाबत विचार विनिमय करण्याकरिता महाविकास आघाडी प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. बैठकीमध्ये आंदोलनाबाबत साधक बाधक चर्चा होऊन आंदोलनाबाबत रूपरेषा ठरवताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान व राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी, तसेच नीट प्रकरणी आत्महत्या केलेल्या 30 विद्यार्थ्यांच्या कुटूबियांना भरीव मदत मिळण्याबाबतची मागणी प्रामुख्याने करण्यात आली. तसेच सोनम वांगचुक यांचे आंदोलन चिरडणार्‍या सरकारचा निषेध करण्याचे बैठकीत ठरवण्यात आले.

धरणे आंदोलनास राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, नितीन बानगुडे पाटील,, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष यशवंत घाडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, मनसेचे राहुल पवार तसेच पुरोगामी संघटनेचे पदाधिकारी, सातारा जिल्ह्यातील व शहरातील प्रमुख नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांनी मोठ्या संख्येने धरणे आंदोलनास उपस्थित राहावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

बैठकीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नितीन शिंदे, प्रदेश चिटणीस प्रवीण धसके, सरचिटणीस राजकुमार पाटील, युवक जिल्हाध्यक्ष समीर घाडगे, महिला जिल्हाध्यक्ष अर्चनाताई देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष संजनाताई जगदाळे, कॉंग्रेस चे जिल्हा सरचिटणीस सादिक बागवान, कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्ष सुषमा राजे घोरपडे, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रणव सावंत, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शफीक शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किसान सेल जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे, तेजस्विनी केसरकर, वैशाली जाधव, सीमा पवार, शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, शिवसेनेचे गणेश अहिवळे, सुमित नाईक, ज्येष्ठ नागरिक सेलचे बाळासाहेब फडतरे, शहर सुधार समितीचे अस्लम तडसरकर, विक्रांत पवार, प्रज्ञा गायकवाड, तेजस जाधव इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हयातील सामाजिक कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन; सोनम वांगचूक यांना पाठिंबा देत पोलिसांच्या कारवाईबद्दल नाराजी
पुढील बातमी
सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक स्टंट केल्याप्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हा

संबंधित बातम्या