सातारा : सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकून संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे आढळून आल्याने एका युवकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिमांड होमजवळील ईदगाह मैदान परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. संबंधित युवक स्वतःची ओळख लपवून संशयास्पद हालचाली करत असल्याचे निदर्शनास आल्याने महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.