उदय हॉटेल ते क्षेत्र महाबळेश्वर रस्त्यावर अपघातांची मालिका; चार वर्षांपासून अर्धवट अवस्थेतील कामे

ठेकेदाराच्या हलगर्जीपणा व पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांसह पर्यटकांच्या जीवाशी खेळ सुरू

by Team Satara Today | published on : 25 November 2026


महाबळेश्‍वर : महाबळेश्वर पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या उदय हॉटेल ते क्षेत्र महाबळेश्वर या दरम्‍यान १०० मीटर रस्‍त्‍याचे काम रखडल्‍याने नवीन रस्‍त्‍यावर अपघाताची मालिका सुरू झाली आहे. सोमवारी रात्री झालेल्‍या अपघातात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. चार वर्षांपासून रखडलेली व अर्धवट अवस्थेतील कामे तसेच ठिकठिकाणी मोऱ्यांची रेंगाळलेल्या कामांमुळे अजूनही हा रास्ता धोकादायक स्थितीत आहे.
ठेकेदाराच्या हलगर्जीपणा व पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे आता पालिकेच्यावतीने धोकादायक ठिकाणाची पाहणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्यासोबतच चार वर्षांपासून रखडलेली रस्त्यासह मोऱ्यांची कामे पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
पालिका अखत्यारीतील क्षेत्र महाबळेश्वर ते केट्स पॉईंटला जोडणारा डचेस रस्ता, हॉटेल ब्लू पार्क ते लॉडविक पॉईंट रस्त्यासह महाबळेश्वर शहरापासून क्षेत्र महाबळेश्वर ला जोडणारा मुख्य रस्ता या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती. या रस्‍त्‍यांसाठी ३६ कोटींचा निधी मंजूर झाला हेता. निधीतून तीन रस्‍त्‍यांची कामे मंजूर झाली होती. चार वर्षांपूर्वी हॉटेल उदयपासून क्षेत्र महाबळेश्वर पर्यंतच्या प्रवासी व प्रदूषण कर नाक्यापर्यंत साडेचार किमीच्या मुख्य रस्त्यावर काँक्रीटीकरणाचे काम सुरु झाले. संथ गतीने हे काम सुरूच होते ते गतवर्षी पूर्णत्वास गेले. रस्ता चकाचक झाला मात्र रस्त्यावरील धोकादायक ठिकाणी असलेल्या मोऱ्याची कामे मात्र गेल्या दिड वर्षांपासून रखडलेलीच आहेत. या ठिकाणचे रस्ते देखील दयनीय अस्वस्थेतच असून दररोज अपघाताला यामुळे निमंत्रण मिळत आहे.
या रस्त्यावरील सबा गार्डननजीक असलेल्या पर्यटकांचे एक वाहन थेट रस्त्या बाजूलाच असलेल्या एका खड्ड्यात कोसळले. सुदैवाने कुणीही जखमी झाले नसले तरी या अपघातात वाहनाचे नुकसान झाले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडील रस्ता काही दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
पुढील बातमी
एका महिलेशी बोलत असल्‍याच्‍या रागातून दोघांवर कोयत्‍याने वार; पाच जणांवर सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल

संबंधित बातम्या