सातारा : ‘विकसित भारत’ घडविण्याचे क्षमता व सामर्थ्य केवळ भारतीय जनता पार्टीमध्येच आहे, ही बाब राज्याच्या कानाकोपर्यातील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पटवून देण्यात यश येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज राष्ट्रवादी कॉंग्रेस (श.प.) गटाचे नेते आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित पाटणकर यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला.
पाटणकर यांच्यासह कोयना शिक्षण संस्थेचे संचालक याज्ञसेन पाटणकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हिंदुराव पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश पवार, पाटण पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ शेलार, पाटण नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, पाटण अर्बन बँकेचे माजी चेअरमन दिनकरराव घाडगे, पाटण तालुका दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार, युवानेते अभिजीत पाटील, राजे संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पाटणकर, माजी उपसभापती रमेश मोरे, पाटण अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन रविंद्र ताटे, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन बाळासाहेब राजेमहाडिक, पाटण तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अविनाश जानुगडे, खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन हणमंतराव खबाले पाटील, माजी उपसभापती प्रताप देसाई, शंकरराव शेडगे, समीर कदम, साहेबराव गायकवाड, निवास शिंदे, अमर पवार आदी पदाधिकार्यांनी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी आज भाजपा परिवाराचे कमळ हाती घेतले.
भाजपा प्रदेश मुख्यालयात संपन्न झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहून पक्षात प्रवेश करणार्या सर्वांचे हार्दिक स्वागत केले. या प्रसंगी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खा. उदयनराजे भोसले, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष आ. अतुल भोसले, भरत पाटील, नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
भारतीय जनता पार्टी ही स्वयंशिस्त आणि व्यापक संघटनेच्या रचनेवर मजबूतपणे उभी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्राचे सत्य सामूहिक पणे साकारले जात आहे. सातारा जिल्ह्यात पक्षबांधणी व विस्तार यासाठी आपण सातत्याने कटिबद्ध राहणार असून पाटण तालुक्यात संघटनेचे विस्तारित जाळे उभे करू. पक्ष जो आदेश देईल त्यासाठी आपल्याकडून प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिली आहे.