सातारा : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प जावली आणि हिरकणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मेढा येथे राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्रम अंतर्गत सुदृढ बालक आदर्श पालक फॅशन शो स्पर्धा घेण्यात आली. जावली तालुक्यात पहिल्यांदाच असा कार्यक्रम असून देखील 40 हुन जास्त बालक व मातानी विविध वेशभूषा करत सहभागी होऊन उपस्थितांना पोषण आहार चे महत्व पटवून दिले.
डॉ. दीपांजली पवार मधुमेह तज्ञ यांनी महिलांना पोषण आहार विषयक मार्गदर्शन केले. तसेच अंगणवाडी बिट तर्फे विविध पोषण आहार स्टॉल व पथ नाट्य सादर करण्यात आले. छत्रपती शिवेंद्रसिहराजे भोसले, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, तहसीलदार, बीडिओ यांनी स्टॉल ची पाहणी करून सेविका व पर्यवेक्षिका च्या कामाचे कौतुक केले.
ज्ञानदेव रांजणे मित्र समूह जावली यांच्या वतीने उत्कृष्ट काम करणार्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत उल्लेखनीय कार्य करणार्या सेविकांना छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रकल्पाच्या सीडीपीओ खामकर, मानसी संकपाल, सर्व पर्यवेक्षिका तसेच हिरकणी फाउंडेशन च्या अध्यक्षा जयश्री शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले.