कृष्णा कदम यांचा मृतदेह सापडला ५ दिवसांनी

मेढा : मासे पकडण्याचे जाळे पाण्यात टाकताना बामणोली भागातील आपटी गावचे रहिवासी असलेले कृष्णा धोंडीबा कदम वय ४३ ही व्यक्ती कोयना जलाशयात पडून बेपत्ता झाली होती. पाच दिवसानंतर आज सकाळी ८वा. त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

घराचे बांधकाम सुरु असल्याने आठवडयापूर्वी मुंबईवरून गांवाला आलेले कृष्णा धोंडीबा कदम हे आपल्या अन्य सहकाऱ्यासह शुक्रवार दि. ३ जानेवारी रोजी सायंकाळी ८वा. आपटी गांवाच्या हद्दीमध्ये कोयना जलाशयामध्ये मासे पकडण्यासाठी जाळे टाकत असताना पाय घसरून ते जलाशयात बुडाले. घटना घडलेपासून पाण्यात बेपत्ता कृष्णा  कदम यांचा शोध सह्याद्री ट्रेकर्स, शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टिम तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मोठमोठ्या गळांच्या साहाय्याने पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच पाण्यात कॅमेरे सोडून ही पाण्याच्या तळाशी पाहण्याचा प्रयत्न केला. तसेच स्पीड बोटच्या साहाय्याने वेगाने पाणी ढवळून काढत मृतदेह पाण्यावर तरंगत येण्यासाठी प्रयत्न केले. सर्व प्रयत्न गेले चार दिवस सुरु होते. पण त्यामध्ये यश आले नाही.

आपटी गावातील कृष्णा धोंडिबा कदम आणि त्याच गावातीलच हरिबा श्रीरंग कदम हे दोघे शुक्रवार तीन जानेवारीला सायंकाळच्या सुमारास होडीतून कोयना जलाशयात आपटी गावच्या खालच्या बाजूला मासे पकडण्यासाठी गेले होते. छोट्या होड्यातून नदीत जाळे सोडत असताना अचानक तोल जावून कृष्णा कदम हे होडीतून पाण्यात पडले. त्यांना थोडेफार पोहता येत असले तरी ते त्या ठिकाणीच बुडाले. तेव्हा पासून त्यांचा शोध लागला नव्हता. आज मंगळवार  दि.७  जानेवारी रोजी सकाळी ८वा. त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताणा आढळून आला. मेढा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. घटनेचा पंचनामा करून कृष्णा कदम यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी मेढा ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.



मागील बातमी
फलटणमधील सराईत दोघांची टोळी तडीपार
पुढील बातमी
फलटणचा कोतवाल लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

संबंधित बातम्या