09:19pm | Sep 13, 2024 |
सातारा : पाच दिवसांचे गणपती आणि गौराई यांना निरोप दिल्यानंतर सातार्यात देखावे पाहण्यासाठी सातारकर घराबाहेर पडू लागले आहेत. रिमझिमत्या पावसामध्ये जिवंत देखावे आणि गणरायाचे भव्य मोहक स्वरूप डोळ्यात साठवण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होत आहे. रिमझिम पाऊस असला तरी भक्तांच्या उत्साहात कुठेही कमीपणा जाणवत नाही. येथील शनिवार पेठेतील बाल विकास गणेशोत्सव मंडळ, तसेच सद्गुरु मित्र मंडळ, फुटका तलाव गणेशोत्सव मंडळ, सोमवार पेठेतील आझाद गणेशोत्सव मंडळ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे गणेशोत्सव मंडळ अशा काही ठिकाणी जिवंत देखावे तसेच नयनरम्य देखावे पाण्यासाठी सातारकरांची पावले तिकडे वळू लागली आहेत.
आता गणेशोत्सवाचा उत्तरार्ध सुरू झाला असून येत्या 16 तारखेला सातारा शहरातील 44, तर उर्वरित 206 मंडळांचे विसर्जन दिनांक 17 रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणार आहे. गणेशोत्सवातील देखावे म्हणजे समाज प्रबोधनासाठीचे व्यासपीठ असल्याने अनेक विषयांवर समाजमन तयार करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग झाला आहे. स्वातंत्र्यसंग्रामात राष्ट्रीय ऐक्य वाढवण्यासाठीच लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. तोच वारसा देखाव्याच्या माध्यमातून जपला जात आहे. यावर्षी अल्पवयीन अत्याचार, महिला सुरक्षा, ऐतिहासिक स्मृतीस्थळांची पडझड अशा अनेक ज्वलंत विषयांमुळे समाजमन ढवळून निघाले आहे. गणेश मंडळांच्या देखाव्यांमधून असेच ज्वलंत विषय, घटनांबाबत सामाजिक जबाबदारी व जाणीव निर्माण करण्यासाठी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. गौरी विसर्जनाबरोबर हे देखावे खुले झाले असले तरी देखाव्यांसाठीचा मंच उभारण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. ऐतिहासिक घटनांसाठी ऐतिहासिक महल व वास्तुंची प्रतिकृती उभारण्यात मंडळाचे कार्यकर्ते व्यस्त आहेत. स्थानिक कलाकारांच्या तालमीसह दिग्दर्शन, वेशभूषा, नेपथ्य, संवाद आदि सर्व जबाबदारी मंडळाचे कार्यकर्ते पार पाडत आहेत.
जिवंत देखाव्यांवर भर...
सातारा शहर व परिसरासह ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे देखाव्यांचे विषय व नियोजनही नीटनेटके केले जाते. सध्याच्या सामाजिक परिस्थितीचा आढावा घेत सातारा शहरातील काही गणेशमंडळांनी यावर्षी जिवंत देखाव्यांवर भर दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शासन, महिला सन्मान, योग्य व त्वरित न्यायनिवाडा, तसेच वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली, स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी लूट आदि विषयांवर जिवंत देखावे गणेश भक्तांना पहायला मिळणार आहेत.
पोलीस यंत्रणा झाली सतर्क
सातारा शहरामध्ये दिनांक 16 व 17 रोजी एकूण 250 गणेशोत्सव मंडळाच्या गणरायांचे दोन टप्प्यांमध्ये विसर्जन होणार आहे. त्यामुळे सातारा शहरात तब्बल 500 हून अधिक पोलीस सातारा शहरांमध्ये, तर जिल्ह्यामध्ये दीड हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. सातारा शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या मंडप परिसरात सीसीटीव्ही तपासणी महिलांसाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था यासारख्या उपायांची काटेकोर पाहणी स्वतः पोलीस अधीक्षक समीर शेख करणार आहेत. विसर्जन तळ्याकडे जाणार्या मार्गावर सातारा पालिकेने डागडुजी केली असून वीज वाहिन्यांचा अंतर्गत अडथळा कोठे आहे का, हे सुद्धा तपासले जात आहे. रात्री उशिरापर्यंत देखावे सुरू राहणार असल्याने साध्या वेशातील सातारा शहर पोलिसांचे डीबी चे 40 कर्मचार्यांचे पथक तैनात राहणार आहे. सर्व बंदोबस्ताची पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पाहणी केली असून त्याचा आढावा घेण्यात आलेला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर स्वतः या बंदोबस्ताचे नियंत्रण करणार आहेत.
दोन बेस आणि दोन टॉप अशी डॉल्बीला परवानगी देण्यात आली असून पारंपारिक वाद्यांना बारा वाजेपर्यंत मुभा आहे. ही सर्व वाद्य यंत्रे प्रमाणित डेसिबल मध्येच वाजणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अधिक क्षमतेच्या डॉल्बींची कारवाई टाळली जावी याकरता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सजग राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे. तसेच मिरवणुकांमध्ये कोठेही अंतर पडणार नाही याची काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |