वृषालीराजे भोसले यांची राज्य बॅडमिंटन संघटनेच्या उपाध्यक्षपदी झालेली निवड अभिमानास्पद - श्रीरंग काटेकर, कर्ण फाउंडेशनकडून वृषालीताईं राजेंच्या सन्मान

by Team Satara Today | published on : 12 October 2026


सातारा :क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाबरोबरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्मितीचा ध्यास घेऊन वाटचाल करणाऱ्या राज्य बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षा वृषालीताईराजे भोसले यांच्या कार्याचा सातारकरांना सार्थ अभिमान वाटतो असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले.                                                                                                                                                ते सातारा येथे कर्ण फाउंडेशन च्या वतीने वृषालीताईराजे भोसले यांची राज्य बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षापदी झालेल्या निवडीबद्दल आयोजित केलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.यावेळी कर्ण फाउंडेशनचे अध्यक्ष शेखर कोल्हापूरे,सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे,गौरीशंकर डी. फार्मसीचे प्राचार्य विजय राजे,विजय कुलकर्णी आदी प्रमुख उपस्थित होते.
श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की, सातारा जिल्ह्याला क्रीडा परंपरेचा वारसा लाभला आहे हाच वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी वृषालीताईराजे भोसले एक सक्षम नेतृत्व राज्य क्रीडा क्षेत्राला लाभले आहे.
राज्य बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षा वृषालीताईराजे भोसले म्हणाल्या की सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या कर्ण फाउंडेशनने माझ्या कार्याची दखल घेऊन केलेला उचित सत्कार मोलाचा आहे.क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना प्रेरणा व प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण करणे यासाठी माझे नेहमीच प्रयत्न राहणार आहेत.
कर्ण फाउंडेशनचे अध्यक्ष शेखर कोल्हापुरे म्हणाले की,सामाजिक क्षेत्रात आमची संस्था काम करीत आहे. समाजासाठी योगदान देणाऱ्या वृषालीताईराजे भोसले यांच्या निवडीने सातारा जिल्ह्यातील खेळाडूंना बळ मिळाले आहे. याचा लाभ खेळाडूंनी घेणे गरजेचे आहे.
सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे म्हणाले की,क्रीडा क्षेत्रातील उत्तुंग ध्येय ठेवून वाटचाल करणाऱ्या खेळाडूंना वृषालीताईराजे भोसले यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे. तसेच त्यांच्या कार्याकाळात राज्य बॅडमिंटन क्षेत्राला नवा आयाम मिळेल याची खात्री आहे. प्रास्ताविक व आभार विजय कुलकर्णी यांनी मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मराठीचा दादा अभिनेता हरपला - जयेंद्र चव्हाण, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना सातारच्या रंगकर्मींच्या वतीने श्रद्धांजली
पुढील बातमी
कोयनानगर येथील नवीन मार्केट परिसरात जखमी बिबट्या जेरबंद; बिबट्या वावरावर नियंत्रणासाठी ठोस कृती आराखडा कधी राबवणार ?

संबंधित बातम्या