एटीएम मशिन फोडून १७ लाखची रोकड लंपास

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाई : येथील एमआयडीसीतील एटीएम चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने फोडून १७ लाखांची रोकड लंपास केली. वाईच्या एमआयडीसीतील मुख्य चौकात श्रीनिवास मंगल कार्यालयाशेजारी एटीएम आहे.

हे एटीएम दररोज सकाळी सात वाजता उघडून रात्री ११ वाजता शटरला कुलपे लावून बंद केले जात होते. मंगळवारीच्या पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने एटीएम मशिन फोडून त्यातील १७ लाख रुपयांची रोकड लंपास केली. घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देऊन पंचनामा केला.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, सातारा एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर घटनास्थळी पोचले. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास परिविक्षाधीन उपअधीक्षक श्याम पानेगावकर करीत आहेत.

मागील बातमी
पूर्णाहुतीने शतचंडी याग सोहळ्याची सांगता
पुढील बातमी
शरद पवार गटाच्या बैठकीमध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

संबंधित बातम्या