संगमनगर येथे घरफोडी; 56 हजारांचे दागिने लंपास

by Team Satara Today | published on : 12 December 2024


सातारा : संगमनगर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन 56 हजारांचे दागिने लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संगमनगर, सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन घरातून 56 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत. याप्रकरणी संतोष राजाराम माने (वय 29, रा. संगमनगर) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 7 ते 9 डिसेंबर या कालावधीत घडली आहे. चोरट्यांनी घरातून सोन्याचे मणी, सोन्याचे पदक, सोन्याची वाटी असा ऐवज चोरी केला आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता
पुढील बातमी
जबरी चोरी प्रकरणी दोनजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या