08:02pm | Jan 10, 2025 |
सातारा : फलटण तालुक्यातील आदर्की बुद्रुक येथे झेडपीच्या शाळेत बालचमुंनी भरवलेल्या आठवडा बाजारात भाजी घ्या..भाजी...शेंगा घ्या.. शेंगा... टोमॅटो घ्या... टोमॅटो अशा अनेक बोबड्या बोलच्या आरोळ्यांनी ग्राहकांना आकर्षित करत मालाची काही वेळातच विक्री केली. या उपक्रमास विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
बालचमुंनी आपल्या घरच्या शेतात पिकलेला भाजीपाला शाळेत आणून तो विकण्याचे धडे नुकतेच घेतले. या आठवडा बाजारास गावातील महिलांनीही आवर्जून शाळेत येवून या बालचमुकडून भाजीपाला खरेदी केला. शाळेमधील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या बाजाराचे नियंत्रण केले. यामध्ये मुले आपापल्या शेतातून आणलेला भाजीपाला, कांदे, हिरवी मिरची, कोथिंबीर, काकडी, भुईंमुंग वाळक्या शंेगा असा भाजीपाला घेवून बसले होते. त्याच्या खरेदीसाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केल्याने काही वेळातच सर्व भाजीपाला संपला. यावेळी आलेल्या ग्रामस्थानी बालचमुंच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली.
बालआनंद मेळाव्यांतर्गत गेली अनेक वर्षे आठवडा बाजार भरविण्यात येत आहे. या वर्षीही हा बाजार झेडपी शाळेच्या व्हरंड्यातच भरविण्यात आला. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, खरेदी-विक्रीचे ज्ञान मिळावे, भविष्यात त्यांना उद्योग व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा आठवडा बाजार भरविण्यात आला होता. यावेळी मुख्याध्यापक सौ. लता भोईटे, सौ. शुभांगी रणवरे यांच्यासह सर्व पालक उपस्थित होते.सातारा बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |

छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |