सातारा : राजेवाडी (पो. निगडी, ता. सातारा) येथे शेत जमिनीच्या वाटपाच्या कारणावरुन झालेल्या वादावादीचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले, त्यात एक महिला जखमी झाल्याची घटना घडली.
शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. मंगल सुधीर भोसले (रा. राजेवाडी, पो. निगडी, ता. जि, सातारा) यांनी याबाबत सातारा तालुका पोलिसांत दिली आहे. त्यावरुन विनोद शंकर जाधव, प्रियांका विनोद जाधव, गंगूबाई शंकर जाधव, मीना रघुनाथ पवार यांनी शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस हवालदार राऊत हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.