बावधन : वाघजाईवाडी (ता. वाई) येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी श्रेया श्रीकृष्ण सावंत हिने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथील स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. तिने एक हजार मीटर मिडले रिले क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकावले. संघात हंसिका तुपे, सई घाडगे, अनुष्का निकम आणि श्रेया सावंत यांचाही समावेश होता
मांढरदेवी ॲथलेटिक्स फाउंडेशनची खेळाडू म्हणून १६ वर्षांखालील मुलींच्या गटात पॅन्टेथेलॉन या क्रीडा प्रकारात श्रेया हिने राज्यात सहावा क्रमांक मिळवून यश संपादन केले. तिला प्रशिक्षक व महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक असोसिएशनचे सहसचिव राजगुरू कोचळे यांचे मार्गदर्शन लाभले.
सातारा जिल्हा क्रीडा समन्वयक शिवाजी निकम, मुख्याध्यापक प्रकाश रासकर, धोंडीराम वाडकर आणि अनिकेत बोबडे, शशांक रहाटीकर, ज्योती मापारी यांचेही तिच्या यशामध्ये मोलाचे योगदान आहे. श्रेयाचे या यशाबद्दल वाघजाईवाडी, बावधन तसेच परिसरातून अभिनंदन होत आहे.