सातारा : इरिगेशन ऑफिस परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 जून रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान सातारा-कोरेगाव रस्त्यावरील इरिगेशन ऑफिस गेट नंबर दोन च्या जवळ पार्क केलेली संतोष भिकू धुमाळ रा. कृष्णानगर, सातारा यांची दुचाकी क्र. एमएच 11 एझेड 3874 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.