सातारा, दि. १२ : वर्ये, ता. सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ऍन्ड रिसर्च या इन्स्टिट्यूट मधुन नुकतीच बीबीए पदवी संपादन केलेलया शृष्टी शिंदेची ऑक्सफर्ड विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे व पदव्युत्तर शिक्षण एम एस इन इंटरनॅशनल बिझनेस यासाठी ऑक्सफर्ड ब्रोकली युनिव्हरसिटी युके येथे प्रवेश घेतला आहे.
या इन्स्टिट्यूट मधून पदवीचे शिक्षण घेऊन पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशात जाणारया विद्यार्थ्यास प्राचार्य शंकरराव उनउने सरांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू व या इन्स्टिट्यूटचे माजी विद्यार्थी अमोल उनउने यांनी रूपये पन्नास हजार रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर केलेली आहे. त्या रकमेचा धनादेश देऊन कु. सृष्टी अंकूश शिंदे हिचा गौरव व सत्कार प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी अमोल उनउने यांच्या हस्ते करण्यात आला. त्या प्रसंगी त्यांनी या इन्स्टिट्यूटमधून पदवी संपादन करून परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास पन्नास हजार रक्कमेची माझे आजोबा प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब उनउने यांच्या नावाने शिष्यवृत्ती देणार असल्याचे जाहीर केले.
अध्यक्षीय भाषणात संचालक डॉ बी एस सावंत म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्या काळामध्ये संस्थेच्या आठ विद्यार्थ्यांना इंग्लंडला शिक्षणासाठी पाठविले होते. आण्णांच्या नावाने असलेल्या या इन्स्टिट्यूटमधून प्रत्येक वर्षी परदेशात शिक्षणासाठी विद्यार्थी जावेत यासाठी मार्गदर्शन कक्षाद्वारे विशेष प्रयत्न केले जातात याचा सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. शिष्यवृती दिल्याबद्दल अमोल उनउने यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय डॉ. एस. एस. भोला यांनी करून दिला. त्यानंतर विविध मान्यवरांनी शृष्टी शिंदे हिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन पूर्ण झाल्यानंतर डॉ. एस. आर. निकम यांनी आभार प्रदर्शन केले.
या विशेष सोहळ्याच्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी प्रा. प्रियंका शिंदे यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली. विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.