सातारा : दारूच्या नशेत एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी सकाळी साडेनऊ ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास शंकर कुंदन भोरे (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) यांनी राहत्या घरात दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार बोडरे करीत आहेत.
आकाशवाणी झोपडपट्टीत दारूच्या नशेत एकाची गळफास घेऊन आत्महत्या
by Team Satara Today | published on : 19 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा