11:54am | Sep 28, 2024 |
मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणे आणि दर्जेदार ग्राहक सेवेसाठी प्रभावी धोरणात्मक उपक्रम राबविल्याबद्दल महावितरणला द गव्हर्नन्स नाऊ या संस्थेतर्फे दोन प्रवर्गात राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आले. दि.२६ सप्टेंबर २०२४ रोजी हॉटेल हॉलिडे इन, एरोसिटी, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या कामकाजात आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून ग्राहकांना पारदर्शक व गतिमान सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महावितरणकडून माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत ग्राहक सेवेत अधिक सुलभता आणणाऱ्या ऊर्जा चॅटबॉट व ईव्ही मोबाईल ॲपसाठी महावितरणला हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
महावितरणचे ऊर्जा चॅटबॉट २४ तास ग्राहकांच्या सेवेत आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना नवीन जोडणी अर्ज, तक्रार नोंदणी करणे, वीजबिल भरणे इ. सेवा सुलभपणे उपलब्ध झालेल्या आहेत. इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेत ग्राहकांना तत्परतेने, सुरक्षितरितीने माहिती प्रदान करून ग्राहकांचे समाधान करण्यात येत आहे. महावितरणच्या इलेक्ट्रिक व्हेईकल उपक्रमासाठी मानव विरहित ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या उभारणी व इलेक्ट्रिक व्हेईकल वापरकर्त्यांसाठी मोबाईल ॲप उपलब्ध करुन दिले आहे. हे ॲप वापरकर्त्यांस चार्जिंग स्टेशन शोधणे व ई-वाहनांच्या व्यवस्थापनात मदत करते. हे ॲप महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या वाढीला चालना देणारे ठरले आहे.
राष्ट्रीय पातळीवरील हे दोन्ही पुरस्कार महावितरणतर्फे महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) एकनाथ चव्हाण यांनी स्वीकारले. या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी मुख्य महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) अविनाश हावरे व माहिती तंत्रज्ञान विभागाचे अभिनंदन केले.
तीन विविध घटनेत तिघेजण बेपत्ता |
खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी वहागाव येथील एकावर गुन्हा |
हुल्लडबाजी कराल, तर पोलीस कारवाईला आमंत्रण द्याल! |
सातारा शहरात 1 जानेवारीला अनोख्या उपक्रमाचा प्रारंभ |
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दि. 1 पासून लिंब येथे विविध कार्यक्रम |
अटल चित्रकला स्पर्धांचे साताऱ्यात आयोजन |
दुष्काळी तालुके येत्या पाच वर्षात दुष्काळ मुक्त करणार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे प्रतिपादन |
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या प्रकल्पांना निधी देणार |
जिल्ह्याने अनुभवला राजघराण्याचा जिव्हाळा |
लेफ्टनंट जनरल श्रींजय प्रताप सिंग यांचेकडून अमर जवान स्मृतीस्तंभावर अभिवादन |
आंधळी उपसा सिंचन योजनेच्या कामाची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
शहर परिसरातील जुगार प्रकरणी आठ जणांवर गुन्हे |
आर्थिक फायद्याच्या अमिषाने दोनजणांचा सुमारे 15 लाखांना गंडा |
खुन प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार जेरबंद |

खंडोबा मंदिरात सोमवती अमावस्येनिमित्त भंडारा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
पाण्याच्या मोटरची चोरी |
फसवणूक प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
विलासपुरात 20 हजारांची घरफोडी |