सातारा : कोडोली, सातारा येथील एका दुकानातून अज्ञात चोरट्याने सुमारे 65 हजारांच्या साहित्याची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 ते 29 दरम्यान अमरलक्ष्मी, कोडोली येथील आयरा मशिनरीज या राहुल भैयाजी इरकर रा. समर्थ नगर, कोडोली, सातारा यांच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने सुमारे 65 हजार रुपये किंमतीच्या साहित्याची चोरी केली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पोतेकर करीत आहेत.