शिवतीर्थावर मराठा बांधवांचा जल्लोष

by Team Satara Today | published on : 02 September 2025


सातारा : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने घेतलेल्या सकारात्मक निर्णयाचे स्वागत सातारा शहरातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात केले. मंगळवारी सायंकाळी शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून जल्लोष साजरा करण्यात आला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवतीर्थावर जमा झाले. एक मराठा लाख मराठा, अशा गगनभेदी घोषणा देत त्यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.

या जल्लोषात शरद काटकर, शरद जाधव, बापू क्षीरसागर, ऍड. शिर्के, बंडू कदम यांच्यासह मराठा समाजातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांनी विशेषत: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आभार मानले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका आणि सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळेच सरकारने निर्णय घेतल्याचे कार्यकर्त्यांचे मत होते. शिवतीर्थावर संध्याकाळभर ढोल-ताशांचा गजर, घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला. मराठा आरक्षणाच्या दिशेने सरकारकडून उचललेले पाऊल हा समाजासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सात दिवसांच्या बाप्पांना गौराईसह भावपूर्ण निरोप
पुढील बातमी
जिवंत देखाव्यांना रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी द्या!

संबंधित बातम्या