स्वसुरक्षेसाठी वाहन मालकांनी दक्षता घ्यावी : प्रमोद शिंदे; 'किसन वीर'तर्फे वाहनांना रिफ्लेक्टरचे वाटप

by Team Satara Today | published on : 15 November 2025


भुईंज :  किसन वीर साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर ऊस तोड वाहनांच्या वर्दळीमुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. संभाव्य अपघात टाळण्यासाठी व स्वसुरक्षेतेसाठी वाहन मालकांनी दक्षता घेऊन आपल्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवून संभाव्य अपघात टाळावेत, असे आवाहन किसन कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी केले.

किसन वीर साखर कारखान्याकडे ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रक, मुंगळा गाडी, बैलगाड्यांना भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहाय्यक पोलीस फौजदार वैभव टकले, सहाय्यक वाहतूक हवालदार सुशांत धुमाळ, संचालक बाबासाहेब कदम, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, हणमंत चवरे, प्रकाश धुरगुडे, संजय कांबळे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांच्या हस्ते रिफ्लेक्टर बसविण्यात आले.

यावेळी शेती अधिकारी विठ्ठलराव कदम, अमृत गोळे, वाहन मालक, शेतकरी, शेती व सुरक्षा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महामार्गावर अपघातात जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍याचा मृत्यू; एकाच ठिकाणी, एका महिन्यात दोन बँक कर्मचार्‍यांचा मृत्यूने हळहळ
पुढील बातमी
फलटण पालिका निवडणुकीसाठी तीन अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी एक, नगरसेवकपदांसाठी दोन उमेदवारी अर्ज

संबंधित बातम्या