सातारा : सातारा तालुक्यातीुल सैदापूर गावच्या हद्दीत कॅनॉलजवळील पाणीपुरवठा करणाऱ्या वीज वितरण डीपीमधून तब्बल ६० किलो वजनाची तांब्याची तार अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरलेली तार अंदाजे २२ हजार रुपये किमतीची असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. याबाबतची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
याबाबत महावितरणचे प्रधान तंत्रज्ञ संतोष सदाशिव खताळ (वय ४३, रा. लिंब) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी डीपी फोडून तांब्याची तार काढून नेल्याचे पोलिस प्राथमिक तपासात दिसून आले आहे. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक माने करत आहेत.