सातारा : वाढे फाटा ते बॉम्बे रेस्टॉरंट मार्गावर भरधाव टेम्पोने व्हेंटो कारला मागून धडक दिल्याने अपघात झाला. या घटनेत कारचे नुकसान झाले असून टेम्पो चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
हर्षवर्धन शशिकांत खाडे (वय 37, रा. मांडवे, ता. खटाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. खाडे हे त्यांच्या व्हेंटो कारमधून (एमएच 10 बीए 9099) वाढे फाटा येथून बॉम्बे रेस्टॉरंटच्या दिशेने जात होते. त्यांची कार ओबेन इलेक्ट्रिकल दुकानासमोर आली असताना मागून येणार्या टाटा टेम्पोने (एमएच 11 एजी 3931) जोरदार धडक दिली. टेम्पो चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
धडकेमुळे व्हेंटो कारचे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. दि. 5 रोजी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार कारळे तपास करीत आहेत.
वाढे फाटा ते बॉम्बे रेस्टॉरंट मार्गावर टेम्पोच्या धडकेत व्हेंटो कारचे नुकसान; चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार
by Team Satara Today | published on : 06 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा