12:25pm | Aug 29, 2024 |
मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. देशातील अल्पसंख्याकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 400 पारपासून दूर ठेवले. एक हाती सत्ता हाच 400 पारचा एकच उद्देश होता. पण देशातील अल्पसंख्याकांनी असे होऊ दिले नाही. पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाने राष्ट्रीय कार्यकारणी बैठक आणि कार्यकर्ता संमेलन मुंबईत झाले. या कार्यक्रमात त्यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केली. विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खेचण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना एक मंत्र दिला.
वक्फ बोर्डानुसार, अल्पसंख्यांकांना जे अधिकार देण्यात आले आहेत, ते संपवण्याचे षडयंत्र करण्यात येत आहे. वक्फ मालमत्तेचे काय करायचे, त्याचा कोणत्या कामासाठी वापर करायचा, हा अधिकार अल्पसंख्याकांचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातून सत्ता खेचण्यासाठी 2 जागा कमी मिळाल्या तरी हरकत नाही, पण आम्ही जादा जागा मागणार नाहीत. गेल्या 10 वर्षांपासून देशाची सत्ता चुकीच्या हातात आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांचा विश्वास संपादन करणे हे सत्ताधाऱ्यांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हा देश सर्वांचाच आहे. ज्यांच्यावर असे वातावरण तयार करण्याची जबाबदारी आहे, ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. लोकसभा निवडणुकीत देशातील पंतप्रधान 400 पारचा नारा देत होते. कशाला हव्या होत्या त्यांना इतक्या जागा? 400 पारचा नारा हा देशाच्या हितासाठी नव्हता. तर एका व्यक्तीच्या हातात अधिकार यावेत यासाठी होता. याविषयीची भीती वेळीच ओळखल्यानंतर 400 पार नाऱ्याचे स्वप्न भंगले. देशातील जनता सामाजिक ऐक्य बंधुता हवी आहे. शांतता हवी आहे. 400 पारचा आकडा ओलांडल्यानंतर यात अडथळा निर्माण होऊ शकला असता.
नवीन संसदेच्या इमारतीच्या उद्धघाटनावेळी अशा लोकांना बोलवण्यात आले, ज्याचे या प्रक्रियेशी काहीही देणे घेणे नव्हते. त्यावेळी संसदेच्या सदस्यांना बोलवण्यात आले नाही. नवीन संसद, आयोध्येतील राम मंदिराला गळती लागली आहे. सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. या सर्व गोष्टीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. रामगिरी महाराजांना कोणी महाराज केले माहिती नाही, पण त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
परळीतील घरफोडीच्या गुन्ह्याची केवळ बारा तासात उकल |
शाहूनगर येथे सुमारे लाखाची घरफोडी |
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर पोक्सो दाखल |
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |