03:28pm | Jan 22, 2025 |
नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेशातील वातावरण सध्या तणावाचे बनले आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पण संदर्भात शेजारील देश बांगला देशाच्या पोटात पुन्हा मुरडा उठला आहे. भारताने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशच्या हवाली केले नाही तर हा दोन्ही देशातील झालेल्या प्रत्यार्पण कायद्याचा स्पष्ट उल्लंघन असेल त्यामुळे भारताने शेख हसीना यांना आमच्या हवाली करावे असे मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचे विधी आणि न्याय सल्लागार आसिफ नजरुल यांनी म्हटले आहे.
ढाका ट्रीब्यून या वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार बांगलादेशचे विधी आणि न्याय सल्लागार आसिफ नजरुल यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतील आहे. यावेळी त्यांनी शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी भारताला पत्र लिहीले आहे. जर भारताने शेख हसीना यांना प्रत्यार्पण केले नाही तर हा दोन्ही देशादरम्यान झालेल्या कराराचा भंग असेल असे म्हटले आहे.
एवढेच नाही तर जर भारताने शेख हसीना यांना आमच्या हवाली केले नाही तर बांगलादेशाच्या परराष्ट्र मंत्रालय आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडे जाऊन या मुद्द्याला मांडणार आहे. हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत. सरकार शेख हसीना यांना मायदेशात परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न करणार आहे. जर आवश्यकता वाटली तर आम्ही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हा मुद्दा मांडू असेही आसिफ
गेल्यावर्षी ५ ऑगस्ट रोजी बांगलादेशात विद्यार्थ्यांनी उठाव करीत शेख हसीना यांचे सरकार उलथवून लावले होते. त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान शेख हसीना यांना परांगदा व्हावे लागले होते. यावेळी शेख हसीना यांनी भारतात आश्रय मागितला होता. त्यानंतर तेव्हापासून त्या भारतात आहेत. आणि या वरुन भारत आणि बांगलादेशाचे संबंध बिघडले आहेत. सीमेवर देखील या वादाचा परिणाम पाहायला मिळाला आहे.भारताने बांगलादेशाचे कार्यवाहक उच्चायुक्त नूर – अल- इस्लाम यांनी समन्स पाठविले आहे. भारताने दोन्ही देशांच्या सीमांवर कुंपण बांधण्यासंदर्भात शिष्टाचाराचे पालन केल्याचे देखील भारताने त्यांना म्हटले होते.
तामजाईनगर येथे 72 हजारांची घरफोडी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
महिलांच्या विनयभंग प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
सातारा शहर परिसरातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
पन्हाळा परिसरातून आवळल्या कोंडवे गोळीबार प्रकरणातील तीन जणांच्या मुसक्या |
अवैधरित्या अग्नीशस्त्र विक्री प्रकरणी तीन युवकांना अटक |
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या सोडत पध्दतीवर अभिप्राय नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन |
रिदमिक व ट्रॅडिशनल योगासन स्पर्धेमध्ये सई ढाणेचे यश |
विठुरायाचे आता थेट दर्शन मिळणार |
सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथे युद्ध स्मारक उभारणार : माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई |
गणिताच्या संपादणूकीत सातारा राज्यात अव्वल |
महिलेस धमकी दिल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून सुमारे सव्वा लाखांची फसवणूक |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
पन्हाळा परिसरातून आवळल्या कोंडवे गोळीबार प्रकरणातील तीन जणांच्या मुसक्या |
अवैधरित्या अग्नीशस्त्र विक्री प्रकरणी तीन युवकांना अटक |
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या सोडत पध्दतीवर अभिप्राय नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन |
रिदमिक व ट्रॅडिशनल योगासन स्पर्धेमध्ये सई ढाणेचे यश |
विठुरायाचे आता थेट दर्शन मिळणार |
सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथे युद्ध स्मारक उभारणार : माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई |
गणिताच्या संपादणूकीत सातारा राज्यात अव्वल |
महिलेस धमकी दिल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून सुमारे सव्वा लाखांची फसवणूक |
जरंडेश्वर नाका परिसरात चैन स्नॅचिंग |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
मंगळवार पेठेत साठ हजारांची घरफोडी |
देऊर येथील दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी |