कोयना धरणामध्ये 70 टीएमसी पाणीसाठा

by Team Satara Today | published on : 09 July 2025


पाटण : कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. धरणांतर्गत विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या सरासरी प्रतिसेकंद 19,181 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरण पायथ्याशी असलेल्या पायथा वीजगृहातील दोन्ही जनित्रांद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2100 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. 

दरम्यान 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाला पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे 34.74 टीएमसी पाण्याची गरज आहे. सध्या कोयना धरणात एकूण 70.51 टीएमसी उपलब्ध तर 65.51 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. सोमवार संध्याकाळी पाच ते मंगळवार संध्याकाळी पाच या चोवीस तासात झालेला पाऊस मि.मी.मध्ये पुढील प्रमाणे -कोयनानगर 46, नवजा 39, महाबळेश्वर 30. धरणातील पाणी उंचीत 1.8 फुटांनी तर पाणीसाठ्यात 1.47 टीएमसीने वाढ झाली आहे. दरम्यान, विभागात पावसाचा जोर वाढला असून पाऊस असाच राहिला तर पुढील काही दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरेल, असा अंदाज आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मॉडेल सौर ग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील ६३ गावांचा सहभाग
पुढील बातमी
आशा सेविकांचे 'झेडपी'समोर आंदोलन

संबंधित बातम्या