सातारा : सातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी साडेपाच वाजण्याच्या सुमारास प्रकाश मारुती ननावरे रा. देगाव, ता. सातारा हे राहत्या घरातून कोणाला काही न सांगता निघून गेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार पिसाळ करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, दि. 12 रोजी ललित बाळासाहेब रसाळ रा. यादोगोपाळ पेठ, सातारा हे राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार बोडरे करीत आहेत.
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता
by Team Satara Today | published on : 15 August 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा