सदरबझारमधील घरफोडीत चोरट्यांनी केले साडेपाच तोळ्यांचे दागिने लंपास

by Team Satara Today | published on : 26 May 2026


सातारा : सदरबझारमध्ये झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सौरभ सुधाकर चिखलीकर (रा.सदरबझार, सातारा० हे काही कामानिमित्त कराड येथे घर बंद करून गेले असता दि. 24 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून घरातील दोन लाख रुपये किमतीचे साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक चांदीचे कॉइन असा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावंजी करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
समर्थ मंदिर परिसराचे रुपडे पालटले; अतिक्रमण हटवल्यानंतर वाहतुकीला दिलासा; दुसर्‍या दिवशीही पालिकेच्या कारवाईचा धडाका
पुढील बातमी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा

संबंधित बातम्या