आरळे येथे घरफोडीची हत्यारे बाळगल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलिसांत गुन्हा

by Team Satara Today | published on : 08 May 2026


सातारा :  आरळे ता. सातारा येथील सर्विस रोडवरील खान स्क्रॅप मर्चंट भंगार दुकानासमोर संशयास्पदरित्या फिरत असलेल्या एका व्यक्तीविरुद्ध घरफोडीची हत्यारे बाळगल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एजाज अहमद (वय ३५, रा. पाटखळमाथा, ता. जि. सातारा) याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलीस हवालदार राजू शिखरे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित संशयित हा सूर्यास्त ते सूर्योदयाच्या दरम्यान आपले अस्तित्व लपवून घरफोडीसाठी वापरली जाणारी हत्यारे स्वतःच्या ताब्यात बाळगून संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला.

या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार बोराटे करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
करंजे नाका परिसरात मद्यप्राशन करून गोंधळ; दोघांवर गुन्हा
पुढील बातमी
पोवई नाका परिसरातून दुचाकी चोरीस

संबंधित बातम्या