एसटी अपघातात एकाचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 15 June 2025


सातारा : एसटी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नारायण वामन भोसले रा. एकसळ, ता. कोरेगाव, जि. सातारा हे एसटी बस चालक सातारा-आलवडी बस क्र. एमएच 14 बीटी 1289 घेऊन जात असताना समर्थ मंदिर चौक, सातारा या ठिकाणी रस्ता ओलांडत असणारे रमेश मारुती पवार रा. मंगळवार पेठ, सातारा यांना एसटी बसची धडक बसून झालेल्या अपघातात रमेश पवार यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरज रमेश पवार यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यात आजपासून होणार शाळा सुरू
पुढील बातमी
चोरीचा प्रयत्न केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या