जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील आरक्षणावरील हरकती व सुचना सादर करण्याचा कालावधी 17 ऑक्टोबरपर्यंत

by Team Satara Today | published on : 15 October 2025


सातारा : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडील दि. 1 ऑक्टोबर 2025 रोजीच्या आदेशान्वये सातारा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 11 पंचायत समिर्तीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षण निश्चित करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे.

त्यासअनुसरुन, सातारा जिल्ह्यातील 65 जिल्हा परिषद गट व 130 पंचायत समिती गणाच्या सदस्यांचे आरक्षण सोडत दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी काढण्यात आलेली आहे. त्यासअनुसरुन, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील प्रारुप आरक्षणावर हरकती व सूचना सादर करण्याचा कलावधी दि. 14 ऑक्टोबर ते दि. 17 ऑक्टोबर 2025 असा आहे. तरी, ज्यांना सदर प्रारुप आरक्षणावर हरकत घ्यावयाची आहे त्यांनी वरील नमुद कालावधीमध्ये कार्यालयनी वेळामध्ये गटाच्या बाबतीत ग्रामपंचायत निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे व गणाच्या बाबतीत संबंधित तहसिल कार्यालयाच्या ग्रामपंचायत निवडणूक शाखेमध्ये समक्ष हरकत दाखल करावी. तद्नंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही, याची कृपया सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यात प्लॅस्टिक विरोधी कारवाईला जोर; वर्ये, सैदापूर, कोंडवे, हमदाबाज, कोडोली, संभाजीनगरमध्ये चाळीस हजारांहून अधिक दंडाची वसुली
पुढील बातमी
महाविकास आघाडीच्या नेत्यांना पराभव दिसू लागलाय ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साताऱ्यात सडकून टीका

संबंधित बातम्या