गल्‍लीतल्‍या नेत्‍यांकडून आरोपांची घाई; राष्‍ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्‍यक्ष शशिकांत शिंदे यांची काँग्रेस नेत्यांवर टीका

by Team Satara Today | published on : 29 November 2026


सातारा : राष्‍ट्रवादी काँग्रेस खासदार शरदचंद्र पवार पक्षाचे नेतेमंडळी पहिल्‍यापासून इंडिया आघाडीच्‍या बैठकांना हजर राहत होते. खा. सुप्रियाताई सुळे याही कालपर्यंत बैठकीला उपस्‍थित होत्‍या. तसेच आजच्‍या बैठकीला झुमद्वारे त्‍या हजेरी लावणार होत्‍या, पण हे होण्‍याआधीच घाई लागलेले मित्रपक्षातील गल्‍लीतले नेते आरोप करण्‍याची घाई करत आहेत, अशी टीका राष्‍ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्‍यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली.
शिंदे म्‍हणाले, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत होणाऱ्या चर्चांना आमच्‍या पक्षाचे नेते मित्रपक्षांसोबत कायम होते. पक्षाचे अध्‍यक्ष खा. शरद पवार हे रुग्‍णालयात असल्‍याने दिल्‍लीतील इंडिया आघाडीच्‍या नेत्‍यांच्‍या बैठकीला खा. सुप्रियाताई सुळे या झुम मिटिंगद्वारे हजेरी लावणार होत्‍या. पण हे होण्‍याआधीच सकाळपासून या विधेयकाला आम्‍ही समर्थन दिले, अशा चर्चा मित्रपक्षांतील नेत्‍यांनी सुरु केल्‍या आहेत.
या विधेयकाबाबत पक्षांतर्गत चर्चा करुन निर्णय घेवू, असे खा. सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले होते. मात्र, मित्रपक्षांनी आमच्‍यावर आरोप केल्‍याने पक्षाचे खासदार आणि नेत्‍यांनी इंडिया आघाडीच्‍या बैठकांना जावूच नये, अशी भूमिका व्‍यक्‍त करायला सुरुवात केल्‍याचे शिंदे यांनी स्‍पष्‍ट केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाबळेश्वरच्या खराब रस्त्यावरुन ‘राजे’ एकदा स्वतः फिराच : खा. संजय राऊत, बांधकाम खाते स्वतःकडे असूनही शिवेंद्रहराजे भोसले यांचे दुर्लक्ष
पुढील बातमी
खोटे-नाटे आरोप करणे हाच त्यांचा उद्योग : ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे खा. संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र, संबंधित कंत्राटदाराला नोटीस दिली

संबंधित बातम्या