नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड फहीम खानविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा

by Team Satara Today | published on : 20 March 2025


नागपूर : नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंडचे नाव समोर आले आहे. गणेशपेठ पोलिस ठाण्यात दंगलखोरांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख आहे. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) चा शहराध्यक्ष फहीम शमीम खान याच्या नेतृत्वाखाली ५० ते ६० लोकांनी बेकायदेशीरपणे पोलिस स्टेशनमध्ये गर्दी जमवली. यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या लोकांनी गांधी गेटजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. दरम्यान फाहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फहीम खानसह अनेक जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हिंसाचारात अनेक बाबी समोर आल्या आहेत. या प्रकरणात बांग्लादेशी दहशतवादी संघटनेचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.  हा फहीम खान कोण आहे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.  फहीम शमीम खानने जमाव जमवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमॉक्रॅटीक पार्टीचा शहराध्यक्ष आहे.

हा फहीम खान कोण आहे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.  फहीम शमीम खानने जमाव जमवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमॉक्रॅटीक पार्टीचा शहराध्यक्ष आहे. विशेष म्हणजे, तोच फहीम खान पोलीस ठाण्यात निवेदन देण्यासाठी गेला होता. नागपूर पोलिसांनी या प्रकरणात 51 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला असून, त्यात फहीम खानचे नाव प्रमुख आरोपींपैकी एक म्हणून समोर आले आहे.

एफआयआरनुसार, फहीम खानने सकाळी 11 वाजता 30 ते 40 जणांना एकत्र करून पोलिसांना निवेदन दिले होते. त्यावेळी त्याने विहिंप (विश्व हिंदू परिषद) आणि बजरंग दल कार्यकर्त्यांविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, त्यानंतरही फहीम खानने पुन्हा जमाव गोळा केला आणि परिस्थिती अधिक तणावग्रस्त केली, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आदित्य ठाकरेंचे रिया चक्रवर्तीला ४४ कॉल
पुढील बातमी
महिलेचे गंठण हिसकवणारा शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात

संबंधित बातम्या