संदीप रिटे खून प्रकरणातील दोनही आरोपींच्या मुसक्या आवळल्या
सातारा स्थानिक गुन्हे शाखेसह फलटण शहर पोलिसांची संयुक्त कारवाई
by Team Satara Today | published on : 14 June 2025

सातारा : संदीप रिटे यांच्या निर्घृण खुनाची उकल करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखा व फलटण शहर पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील दोनही आरोपींना अटक करण्यात आली आहे.मंगेश उर्फ मोन्या सचिन मदने वय 21 आणि सोमनाथ माणिक मदने वय 32 दोघेही रा. बोडरेवस्ती, ठाकूरकी, ता. फलटण, जि. सातारा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी अज्ञात इसमांनी संदीप मनोहर रिटे रा. ठाकूरकी, ता. फलटण यांचा निर्घृण खून केल्याची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.खुनाची घटना अतिशय गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व पोलीस अंमलदार अमोल माने, अजित कर्णे, जयवंत खांडके, स्वप्निल दौंड, वैभव सावंत यांचे तपास पथक तयार करून गुन्हा उघड करण्याच्या सूचना देऊन फलटणला पाठवले होते.या पथकाने फलटण येथे जाऊन देवकर यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे फलटण शहर पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांच्या समवेत तपास केला असता रिटे हे दि. 10 रोजी सकाळी कामावर गेले होते, तेव्हापासून घरी आले नसल्याची माहिती मिळाली. घटनास्थळावरून माहिती घेतली असता झाल्या प्रकाराबाबत काही एक माहिती मिळून येत नव्हती. मात्र तपास पथक सर्वतोपरी प्रयत्न करत होते.दिनांक 12 रोजी देवकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाले की फलटण शहरातील मच्छी मार्केट येथे दिनांक दहा रोजी सायंकाळी मृत संदीप रिटे व अज्ञाताचा मोबाईल घेतल्याच्या कारणावरून वाद झाला होता त्या अज्ञाताने महेश संदीप यांचा मोबाईल काढून घेऊन तो तिथून निघून गेला होता त्याच्या पाठोपाठ मयत संदीप रिटे हे देखील गेले असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या तपास पथकाने वेशांतर करून तपासाची दिशा ठरवत तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांचे जाळे तयार करून त्या अज्ञानाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा त्याच्या चुलत भावाच्या सांगण्यावरून साडेपाच लाख रुपयांची सुपारी ठरवून तसेच संदीप रिटे यांना जीवे मारल्यानंतर पैसे देण्याच्या अटीवर केला असल्याची कबुली दिली. यानंतर त्याच्या चुलत भावालाही ताब्यात घेण्यात आले.या कारवाईत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा, फलटण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, नितीन नम, नितीन शिंदे, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पारितोष दातीर, गोपाल बदने, पोलीस अंमलदार मोहन नाचण, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, अमोल माने, अजित कर्णे, जयवंत खांडके, मुनीर मुल्ला, हसन तडवी, सनी आवटे, अजय जाधव, अमित झेंडे, अमृत कर्पे, पंकज बेसके, शिवाजी भिसे, प्रवीण कांबळे, स्वप्नील दौंड, केतन शिंदे, रविराज वर्णेकर, प्रवीण पवार, वैभव सावंत, दलजीत जगदाळे, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलिस अंमलदार अनिल बारेला, बापूराव धायगुडे, राजेंद्र नाळे, नितीन सजगणे, सचिन भोसले, चंद्रकांत धापते, जितेंद्र टिके, काकासो कर्णे, सचिन पाटोळे, गणेश अवघडे, निखिल गायकवाड, अतुल बडे, महिला पोलीस अंमलदार राणी फडके, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस अंमलदार यांनी सहभाग घेतला.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा