अवयवदान जनजागृतीसाठी दि. २८ डिसेंबर रोजी साताऱ्यात पिंक रिव्होल्युशन ऑर्गन डोनेशन रनचे आयोजन

by Team Satara Today | published on : 05 December 2025


सातारा :  कोमल न्यू लाईफ फाउंडेशन आणि पिंक होलीक इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोमल न्यू लाइफ फाउंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त सलग चौथ्या वर्षी दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी  सातारा येथील लँडमार्क बिझनेस सेंटर येथे पिंक रिव्होल्युशन ऑर्गन डोनेशन रनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

ते पुढे म्हणाले, या उपक्रमाचा मुख्य उद्देश अवयवदानाबाबत जनजागृती करणे हा असून कार्यक्रमात इच्छुक नागरिकांकडून अवयवदानाचे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. स्पर्धा ३ व ५ किलोमीटर अशा दोन गटांत होणार असून नोंदणी शुल्क प्रत्येकी ४०० रुपये आहे. सर्व सहभागी महिलांना टी-शर्ट, मेडल, प्रमाणपत्र व ब्रेकफास्ट देण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटातील महिलांसाठी असून पुरुष व मुलेही सहभागी होऊ शकतात.नोंदणी आवश्यक असून Townscript लिंकद्वारे नोंदणी करता येणार आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी जयश्री शेलार– ८६०५८९७२५१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सहभागींसाठी लकी ड्रॉ व ऑर्गन डोनेशन थीम प्राइजचे ही आकर्षण ठेवण्यात आले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पिरवाडीत विजेच्या उच्च दाबामुळे विद्युत उपकरणे जळाली; 12 लाख रुपयांचे नुकसान, तक्रार देऊनही वीज वितरण विभागाचे कानावर हात
पुढील बातमी
पांगरखेल ग्रामस्थांनी बांधला श्रमदानातून वनराई बंधारा; समृद्ध ग्राम योजनेत अग्रेसर राहण्याचा निर्धार

संबंधित बातम्या