नवी दिल्ली : सध्या भारत आणि कॅनडाचे संबंध मोठ्या प्रमाणात बिघडले आहेत. दोन्ही देशांचे संबंध चिघळण्याला कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो जबाबदार आहेत. मतांच्या राजकारणासाठी ते भारतविरोधी खलिस्तानी दहशतवाद्यांना पाठिशी घालत आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरुन त्यांनी भारतावर तथ्यहीन आरोप केले. त्यामुळे ते वादात सापडले आहेत. आता टेस्लाचे सीईओ आणि अब्जाधीश एलॉन मस्क यांनी जस्टिन ट्रूडो यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. मस्क यांनी जस्टिन ट्रूडोच्या राजकीय करिअरवर भाष्य केलं आहे. ‘कॅनडामध्ये पुढच्यावर्षी होणाऱ्या निवडणुकीत ट्रूडो यांना निरोप निश्चित आहे’ असं मस्क यांनी म्हटलं आहे. सोशल मीडियावर एका व्यक्तीने मस्क यांच्याकडे मदत मागितली. ट्रूडोपासून मला सुटका करायची आहे, मला मदत करा असं त्या व्यक्तीने सांगितलं.
जर्मनीतून समाजवादी सरकार गेल्यानंतर या व्यक्तीने कॅनडातून ट्रूडोंपासून पाठलाग सोडवण्यासाठी मस्क यांच्याकडे मदत मागितली. त्यावर मस्क यांनी हे म्हटलय. कॅनडामध्ये पुढच्यावर्षी निवडणुका होणार आहेत. सध्या अल्पमताच सरकार चालवणाऱ्या ट्रूडो यांच्यावरील दबाव वाढत चालला आहे. या निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित मानला जातोय. डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय असलेल्या मस्क यांनी अशी टिप्पणी करणं अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार संभाळल्यानंतर त्यांच्या भावी योजना काय असतील? त्याचे संकेत यातून मिळतात.
मागच्यावर्षी कॅनडाच्या संसदेत बोलताना जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचा आरोप भारतावर केला होता. यानंतर भारत आणि कॅनडामधील राजनैतिक तणाव वाढला. मागच्यावर्षी कॅनडाच्या सरे येथे एका गुरुद्वाराबाहेर हरदीप सिंह निज्जरची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. निज्जर खलिस्तानी दहशतवादी होता. खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख होता. अनेक वर्षांपासून तो कॅनडात रहायला होता. भारताविरुद्ध कारवाया करण्यामध्ये सक्रीय होता.
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |
कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव |
सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरचा विकास करणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले |