शरद पवारांना आता CRPF अंतर्गत केंद्र सरकारची झेड प्लस सुरक्षा

by Team Satara Today | published on : 21 August 2024


नवी दिल्ली : राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. CRPFअंतर्गत केंद्र सरकारची झेड प्लस सुरक्षा देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. आजपासूनच सुरक्षेत वाढ करण्यात आली असून 10 कमांडो शरद पवारांच्या सोबत असणार आहेत. CRPF च्या अधिकाऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. बिलार्ड पिअर येथील कार्यालयात ही भेट झाली. आगामी विधानसभा निवडणुका आणि राज्यातील सध्याचे वातावरण पाहता शरद पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याची माहिती आहे.
झेड प्लस सुरक्षा ही भारतातील सुरक्षिततेची सर्वोच्च श्रेणी मानली जाते. झेड प्लस सुरक्षेत, 10 पेक्षा जास्त कमांडो आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह 55 प्रशिक्षित कर्मचारी संबंधित व्यक्तीजवळ तैनात जातात. हे सर्व कमांडो 24 तास त्या व्यक्तीभोवती बारीक नजर ठेवतात. सुरक्षेमध्ये गुंतलेला प्रत्येक कमांडो मार्शल आर्टमध्ये तज्ञ असतो. यासोबतच या गटाकडे आधुनिक शस्त्रेही असतात. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासह अनेक मोठे नेते आहेत ज्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
दरम्यान, गृह मंत्रालया अंतर्गत सुरक्षेचे अनेक प्रकार आहेत. जसे- X, Y, X आणि Z+. यामध्ये झेड प्लस ही सुरक्षा सर्वोच्च सुरक्षा आहे. एखाद्या व्यक्तीला कोणती सुरक्षा मिळेल याचा निर्णय गृह मंत्रालय घेत असते. मंत्रालयाकडून विशेष अधिकार असलेली समिती वेगवेगळ्या स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेते. अनेक वेळा लोक यासाठी अर्ज करतात, परंतु गृह मंत्रालय राज्य सरकारशी सल्लामसलत करून त्यावर निर्णय घेते. त्यानंतर ते आपला अहवाल केंद्र सरकारला पाठवते. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चर्चा होते आणि त्यानंतरच अंतिम मंजुरी दिली जाते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारसाठी अजितदादांनी दिलेला शब्द पाळला!
पुढील बातमी
अनवडी पोलीस पाटील राज्यपाल पुरस्काराने सन्मानित...!

संबंधित बातम्या