अल्पसंख्याक हक्क दिवस 18 डिसेंबर रोजी होणार साजरा

by Team Satara Today | published on : 17 December 2024


सातारा : अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादीचे संवर्धन करता यावे यासाठी दिनांक 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी  जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी शशिकांत माळी यांनी दिली आहे.

अल्पसंख्यांकाना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्कांबाबत जाणीव करुन देण्यासाठी  परिषद सभागृह, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे बुधवार दि. 18 डिसेंबर, 2024   रोजी  दुपारी 12.30 वाजता अल्पसंख्याक हक्क दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही श्री. माळी यांनी कळविले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्प व्याजदाराने त्वरित वाहन तारण कर्ज उपलब्ध : अमोल मोहिते
पुढील बातमी
थंडीमध्ये पाठदुखी वाढली?

संबंधित बातम्या