'पुष्पा 2' च्या प्रदर्शनाची ठरली तारीख आजपासून 100 दिवसांनी चित्रपटगृहात

अल्लू अर्जुनचा धमाका

by Team Satara Today | published on : 29 August 2024


साऊथ स्टार अल्लू अर्जुन चा यावर्षीचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा - द रुल'च्या रिलीजला जसजसा विलंब होत आहे, तसतशी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढत आहे. पण आता निर्मात्यांनी चित्रपटाच्या नवीन पोस्टरच्या माध्यमातून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. नवीन पोस्टरमध्ये, अल्लू अर्जुनपुष्पा राजच्या अवतारात पाहायला मिळतो आहे.

'पुष्पा २' च्या नवीन पोस्टरसह टॅगलाइन लिहिली आहे, '१०० दिवसांत रूल पाहा'. म्हणजेच हा चित्रपट आजपासून १०० दिवसांनी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. नवीन पोस्टर पुष्पा आणि भंवर सिंग यांच्यातील ॲक्शन पॅक्ड लढाईकडे इशारा करत आहे. यासोबतच चाहत्यांना आणि प्रेक्षकांना एक थरारक सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी सज्ज आहे.

'पुष्पा २' कधी येतोय भेटीला? 
मैत्री मुव्ही मेकर्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्टर कॅप्शनसह अपलोड केले गेले आहे. '#Pushpa2TheRule साठी १०० दिवस बाकी, बॉक्स ऑफिसच्या प्रतिष्ठित अनुभवासाठी सज्ज व्हा. ६ डिसेंबर २०२४ रोजी थिएटरवर राज्य करण्यासाठी सज्ज.

'पुष्पा २' ची स्टार कास्ट
पुष्पा: द राइज चित्रपट जबरदस्त हिट ठरला.पहिल्या चित्रपटाच्या यशामुळे या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक म्हणून 'पुष्पा - द रुल' हा सीक्वलसाठी मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. पुष्पा राजच्या भूमिकेत अल्लू अर्जुनचा अभिनय पुन्हा एकदा पडद्यावर अधिराज्य गाजवणार आहे. अर्जुनचा अभिनय कथेला एका नव्या उंचीवर नेईल, अशी अपेक्षा आहे. सुकुमार दिग्दर्शित आणि फहद फासिल आणि रश्मिका मंदाना यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला हा चित्रपट ६ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पावसाळ्यात ही फळे दररोज खा! 
पुढील बातमी
सलमान खान याच्या बॉडीगार्डने खरेदी केली तब्बल तब्बल 1.4 कोटीची आलिशान कार

संबंधित बातम्या