चाहूरखेडमध्ये घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार

by Team Satara Today | published on : 08 September 2026


सातारा : चाहूरखेड येथे घरासमोर उभी केलेली होंडा एचएफ डिलक्स मोटारसायकल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या दुचाकीची किंमत २० हजार रुपये असल्याचे पोलिसांत दाखल फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत किरण महादेव जाधव (वय ४९, रा. चाहूरखेड, ता. जि. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
३ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास घरासमोर उभी केलेली दुचाकी ४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. लाल-काळ्या रंगाची एमएच ११ एमयू ३७०९ क्रमांकाची होंडा एचएफ डिलक्स अज्ञाताने फिर्यादीच्या संमतीशिवाय नेली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून महिला पोलीस हवालदार अवघडे तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा; आप्पासाहेब पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमधील घटना, जखमी विद्यार्थिनीच्या आईची तक्रार
पुढील बातमी
शनिवार पेठेत घरफोडी; सुमारे 60 हजारांचा ऐवज लंपास, अज्ञाताविरुद्ध घरफोडीचा गुन्हा

संबंधित बातम्या