सातारा : एकात्मिक बालविकास योजना यांचे संयुक्त विद्यमाने नालसा, मालसा च्या विविध कल्याणकारी योजना, समाजातील महिलांची सुरक्षितता आणि गोपनियता, कौटुंबिक हिंसाचार, सायबर सुरक्षा, अत्याचार आणि अस्पृश्यता निर्मूलन, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन साबळेवाडी (वेण्णा नगर), गणेशमंदिर ता. जि. सातारा येथे करण्यात आले .
कार्यक्रमामध्ये निना बेदरकर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा, अॅड, मनिषा बर्गे, मध्यस्थी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा, श्रीमती लिला पवार, अंगणवाडी सुपरवायझर हे उपस्थित होते.
निना बेदरकर, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांनी नालसा मालसाच्या विविध कल्याणकारी योजना, समाजातील महिलांची सुरक्षितता आणि गोपनियता, सायबर सुरक्षा या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
अॅड, मनिषा बर्गे यांनी कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार आणि अस्पृश्यता निर्मूलन, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी कायदेविषयक योजनांचे माहितीपत्रके वाटप करण्यात आली.