हल्लेखोरांना कडक शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करणार ; संपर्कप्रमुख रेश्मा जगताप यांचे आश्वासन, माजी सैनिकाच्या कुटुबियांचे चितळीत सांत्वन

by Team Satara Today | published on : 10 March 2026


सातारा  : चितळी, ता. खटाव येथील माजी सैनिक रणजित निकम यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला असून त्यात त्यांचा मृत्यू झाला. यातील पाच आरोपीना अटक केली असली तरी त्यांना कडक शिक्षा कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना याबाबत कल्पना देऊन पोलीस प्रशासनाला तशा सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही सातारा संपर्कप्रमुख सौ. रेश्मा जगताप यांनी दिली.

चितळी येथे सौ. जगताप व शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी निकम कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना सातारा व जावळी महिला तालुका प्रमुख विद्या बर्गे, उज्वला निकम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सौ. जगताप यांना सैनिकांवर खुलेआम हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कुटुंबियांची भेट घेतली. माजी सैनिक रणजीत निकम यांच्यावर धारधार शस्त्राने हल्लेखोरांनी भ्याड हल्ला यामध्ये  त्यांचा मृत्यू झाला याच्या निषेधार्थ अनेकांनी हल्लेखोरांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे व फरार आरोपी तत्काळ पकडला गेला पाहिजे अशी मागणी केली. यावर पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यातील एक अल्पवयीन आहे. याबाबत निकम कुटुंबियांनी झालेला प्रकार त्यांना सांगितला. 

सध्या निकम परिवारातील मुले शाळेत जात नाहीत. ती घाबरत असून शालेय शिक्षकही त्यांच्या संरक्षणाबाबत हात झटकत आहेत. यावर सदर विषय खूपच गंभीर असून सदर आरोपीची जामीनावर सुटका झाली नाही पाहिजे. त्यांना जास्तीत जास्त शिक्षा लागावी यासाठी प्रयत्न करणार आहेच. मात्र, सदर घटना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगून पोलीस प्रशासनाला सूचना करायला लावणार असल्याची ग्वाही सौ. जगताप यांनी निकम कुटुंबियांना दिली. यावेळी सैनिक फेडरेशन व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
धुमसणाऱ्या कचरा डेपोवरून सोनगाव ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा; सातारा पालिकेला निवेदन
पुढील बातमी
गर्भाशय मुखाचा कॅन्सर टाळण्यासाठी मुलींना मोफत लसीकरण मोहिमेचे साताऱ्यात उद्घाटन; अत्यंत सुरक्षित उपाय

संबंधित बातम्या