सातारा : कारी येथे अज्ञात चोरट्यांनी संसारिक साहित्याची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कारी ता.सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन घरातून 18 हजार रुपये किंमतीची पितळीची भांडी चोरुन नेली. याप्रकरणी जयवंत यशवंत तिपाळे (वय 57, रा. कारी) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा