सातारा : आर्थिक लाभाच्या आमिषाने महिलेची सुमारे साडे एकवीस लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात इंस्टाग्राम अकाउंट धारकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंजुळा राहुल घाडगे रा. दौलत नगर, सातारा या त्यांच्या घरी मोबाईलवर ऑनलाइन काम आहे का, पाहत असताना फ्लेम स्क्रीबलर यांची जाहिरात आली. यानंतर संबंधितांनी त्यांच्या फोनवर दि. 3 ते 8 डिसेंबर 2024 दरम्यान वेगवेगळ्या लिंक पाठवून त्यांना डिस्काउंट चे आमिष दाखवले. सुरुवातीला काही दिवस पैसे पाठवल्यानंतर त्यांनी डिस्काउंट देऊन घाडगे यांचा विश्वास संपादन केला. त्यावरून घाडगे यांनी त्यांच्या बँकेच्या अकाउंट वरून तसेच रोख रकमेद्वारे 21 लाख 68 हजार दोनशे रुपये पाठवले. त्यापैकी 30000 रुपये परत मिळाले. मात्र 21 लाख 38 हजार दोनशे रुपये घाडगे यांना मिळाले नाहीत. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात इंस्टाग्राम अकाउंट धारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढेरे करीत आहेत.
आर्थिक लाभाच्या आमिषाने महिलेची फसवणूक
by Team Satara Today | published on : 15 February 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
म्हसवे येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या
March 21, 2026
मर्ढेकर यांनी कवितेला नवे परिमाण दिले : डॉ. माने
March 21, 2026
सातारा झेडपीमध्ये ‘डर्टी गेम’
March 21, 2026
घरफोडीच्या तयारीत असलेली टोळी तालुका पोलिसांनी केली जेरबंद
March 19, 2026