सातारा : सोनगाव, ता. सातारा च्या हद्दीत कुरणेश्वर मंदिराच्या पिछाडीला कोर्टाच्या आदेशाने सील केलेल्या प्लॉटमध्ये अनाधिकाराने प्रवेश केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपाली विजय शिंदे, विजय सर्जेराव शिंदे रा. श्री गणेश अपार्टमेंट कुरणेश्वर मंदिराच्या मागे असे संबंधितांचे नाव आहे. नंदकुमार साबळे वय 33 रा. शिवथर, ता. सातारा यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, या प्रकरणातील आरोपींनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून सील केलेल्या 512 अ प्लॉट क्रमांक 201 (2) मध्ये अनाधिकाराने प्रवेश केला. हे प्लॉट कुरणेश्वर मंदिराच्या मागे आहेत. या मिळकती संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. असे असताना संबंधितांनी या प्लॉटमध्ये अनाधिकाराने प्रवेश केल्यामुळे त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार निकम अधिक तपास करत आहेत.
खाजगी मिळकतीत प्रवेश केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 22 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा