सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, अशी दि. 22 रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एक युवती गावी जाण्यासाठी सातारा बस स्थानकातील बसमध्ये चढत असताना अविनाश जगदेव राठोड रा. दौलतनगर, ता. सातारा याने तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिले करीत आहेत.