'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बंद होणार

कारणही आलं समोर! 

by Team Satara Today | published on : 30 August 2024


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा प्रेक्षकांचा आवडता शो. गेली अनेक वर्ष हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. सचिन गोस्वामी-सचिन मोटे यांची निर्मिती-दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो अनेकांच्या घरात आवडीने बघितला जातो. या शोमधील कलाकारांनी लोकांचं प्रेम मिळवलंय. पण आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो बंद होणार आहे. कलाकारांनी पोस्ट करुन याविषयी खुलासा केलाय. 

म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो बंद होणार

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचे कलाकार रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब यांनी इंन्स्टाग्राम स्टोरीवर हास्यजत्रेच्या सेटचा फोटो शेअर केलाय. या फोटोवर see you soon असं लिहिण्यात आलंय. याचाच अर्थ 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो बंद होणार असल्याचं समजतंय. यामागचं एक मोठं कारण म्हणजे, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो आता अमेरिका टूरवर जात आहे. या दौऱ्यावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'शोचे सर्व कलाकार सहभागी होणार आहेत. १९ सप्टेंबर ते २६ ऑक्टोबर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचे कलाकार या टूरवर असणार आहात. त्यामुळे टेलिव्हिजनवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'शो काही काळ तरी बंद होणार आहे.

या कलाकारांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवलं

कोविडच्या काळापासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो आणखी लोकप्रिय झाला. प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, गौरव मोरे, वनिता खरात, रसिका वेंगुर्लेकर, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, ओंकार राऊत या कलाकारांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो गाजवला. सध्या बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये सहभागी झालेला पॅडी कांबळेही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा महत्वाचा भाग होता. आता काही काळ ब्रेक घेऊन 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा कधी भेटीला येईल याची सर्वांना उत्सुकता आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल
पुढील बातमी
छत्रपती शिवरायांच्या पुतळा प्रकरणावरून कोणालाही लक्ष करू नये

संबंधित बातम्या