सातारा : सदर बाजार सातारा येथे राहणारे प्रसाद गजानन कंठक (वय ४७ वर्ष) यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घराच्या गेटचे कुलूप लावलेला कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करत घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून अज्ञात चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला आहे. ही घटना १५ जानेवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान घडली असल्याची फिर्यादीत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पोतेकर करत आहेत
सदर बझार येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याकडून चोरीचा प्रयत्न
by Team Satara Today | published on : 20 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा