साताऱ्यात जुन्या वादातून तरुणाला मारहाण; पोलिसांत गेल्यास कुटुंब संपविण्याची धमकी

by Team Satara Today | published on : 27 September 2026


सातारा : पूर्वीच्या वादाचा राग मनात धरून दोघांनी तरुणासह त्याच्या मित्राला हाताने आणि प्लायवूडच्या तुकड्याने मारहाण केल्याची घटना शनिवार पेठेत घडली. तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेल्यास संपूर्ण कुटुंब संपविण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
इर्शाद इनुस झेंडे (वय 30, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली असून सिद्धार्थ पवार आणि सूरज चौगुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दि. 24 रोजी रात्री झेंडे हे मित्र शाहीद याच्यासोबत शनिवार पेठेतील कमानी हाऊसजवळील गोविंद पान शॉप येथे होते. त्यावेळी संशयितांनी दोघांशी वाद घालत मारहाण केली. प्लायवूडच्या तुकड्याने मारल्याने दोघे जखमी झाले. पोलिसांत गेल्यास अख्खे कुटुंब संपवून टाकीन’, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रांगेत घुसण्यास विरोध केल्याच्या कारणावरून झालेल्या वादात मर्ढेत कुटुंबावर लाठी-दांडक्याने हल्ला

संबंधित बातम्या