विवाहितेच्या विनयभंग व सासू, सासरे आणि पतीला मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 14 October 2026


सातारा : सातारा शहर परिसरातील उपनगरातील एका घरात घुसून विवाहितेचा विनयभंग केल्याची तसेच तिच्या सासू, सासरे आणि पतीला मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. 13) दुपारी घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा शहर परिसरातील एक 23 वर्षीय विवाहिता मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास आपल्या राहत्या घरी असताना संशयित चौघे त्यांच्या फ्लॅटमध्ये घुसले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादीच्या सासू, सासरे आणि पती यांना मारहाण केली. यावेळी एका संशयिताने फिर्यादीला त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी सुरेश भोसले, सचिन भोसले याचा एक भाऊ (नाव समजू शकले नाही), योगेश माने आणि किरण पवार यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सातारा शहर पोलीस करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरातील आदित्यनगरीत जमिनीच्या वादातून युवकावर चाकूने वार; चारजणांवर गुन्हा
पुढील बातमी
महामार्गावर सातारा तालुक्यातील खेड गावच्या हद्दीत डंपरची दुचाकीला धडक; वृद्धाचा मृत्यू

संबंधित बातम्या